Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून २ कोटी ९० लाखाचा थेट निधी मंजूर


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते ता- माळशिरस येथील नातेपुते नगरपंचायतीला
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून २ कोटी ९० लाखाचा थेट निधी मंजूर झाल्याची माहिती आज माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील साहेब यांनी आज प्रसार माध्यमांना दिली.

ते पुढे म्हणाले की,दिनांक २ मार्च २०२३ रोजी नातेपुते नगरपंचायतीला निधी मिळण्याबाबत तात्कालीन नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी पत्राद्वारे मागणी केली होती.
त्यानंतर स्वतः सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्याकडे निधीचे पत्र घेऊन गेलो. असता त्यावर त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे ६/३/२०२३रोजी शिफारस करून त्यावर राज्याचे कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी माळशिरस तालुक्यातील विकास कामांसाठी विशेष बैठक आयोजन करून दिनांक १०मार्च 2023 रोजी केले.

या बैठकीत शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत सर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महावीर नाना देशमुख उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे स्वीय सहाय्यक प्रवीण लटके आदींना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी निमंत्रित करून. नातेपुते नगरपंचायतीला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १००% टक्के थेट अनुदान योजने अंतर्गत निधी बाबत चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सदर प्रकल्प खर्चाचा 100% हिस्सा राज्य शासन  करणार असल्याचे जाहीर केले व तसे आदेश अर्थ खात्यात दिले. त्यामध्ये खालील कामांचा समावेश करण्यात आला आहे. १)पुणे पंढरपूर रोडडिव्हायडरवर स्टेट लाईट बसवणे २) शंकर राव कॉम्प्लेक्स ते सचिन ठोंबरे यांचे घर नातेपुते रोडवर स्टेट लाईट बसवणे ३) नातेपुते फोंडशिरस रोड स्टेट लाईट  बसवणे आदी कामांसाठी मंजुरी देण्यात आली असून.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदेला निधी वितरण करण्याबाबत सण २०२३/२४ लेखाशीर्ष ४२/१७ ०६०३ अंतर्गत नातेपुते नगरपंचायत जिल्हा सोलापूर करिता रक्कम रुपये २कोटी ९० लक्ष महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक न पा वै 2020/ 23  प्र/क्र( ३२८) ( 141 )भाग १ /न वी १६ मंत्रालय मुंबई ४००००३२
दिनांक 3 ऑगस्ट2023
यावर    आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत सर यांनी माळशिरस तालुक्यातील विकासासाठी कोणतीही उनिव ठेवणार नसल्याचे सांगितले व ते पुढे म्हणाले की पुणे मुंबईच्या धरतीवरील स्ट्रीट लाइट असतील असं लवकरच नातेपुते शहर असेल. व त्यामुळे नागरिकांना आपलं शहर पुण्या मुंबईच्या धर्तीवर विकसनशील होताना. दिसेल तसेच राहिलेल्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.

शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत सर यांनी जिल्हा नियोजन मंडळातून सुद्धा माळशिरस तालुक्यासाठी विशेष निधी दिला जाईल असेही ते  म्हणाले.

Post a Comment

0 Comments