#Chiplun:कालुस्ते गावाला पोसरे सब स्टेशन येथुन वीज पुरवठा होणार



१२लाखांचा निधी मंजूर: ग्रामस्थांनी मानले आ. शेखर निकम यांचे आभार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कालुस्ते गावात गेले अनेक वर्षे विजेची समस्या भेडसावत होती अनेक वर्षे पोसरे सब स्टेशनवरुन कालुस्ते गावाला विजेचा पुरवठा करावा अशी मागणी होती.यावेळी गावातील ग्रामस्थ यांनी आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पोसरे सबस्टेशन येथून विज पुरवठासाठी जिल्हा नियोजन मधून १२ लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल व गावातील इतर कामासाठी निधी दिल्याबद्दल ग्रामस्थ यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखरजी निकम सर यांचे आभार मानले.
यावेळी हुसेन अब्बास परकार,अहमद अब्दुल गफार परकार,अब्दुल लतीफ हसन परकार,मेहमूद उमेर परकार,गुलाम अब्दुल कादिर परकार,अब्दुल रज्जाक इस्माईल,उमर सुर्वे,सज्जिद अब्दुल रज्जाक परकार,मुश्ताक अली सुर्वे,नुर बिजले आदी मान्यवर उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम