#Chiplun:चिपळूण शहराच्या विकासासाठी शासनाच्या ठोक तरतुदी अंतर्गत ६ कोटींचा निधी मंजूर

आमदार शेखर निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शासनाच्या ठोक तरतूदीअंतर्गत चिपळूण शहरासाठी एकूण ६  कोटींची विकासकामे मंजूर झाली असून त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील कब्रस्तान, गांधारेश्वर, रामतीर्थ सुशोभिकरणासह विविध कामांचा समावेश आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आतापर्यत एकून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.



ते पुढे म्हणाले की, शहरातील विविध विकासकामांना चालना देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित प्रश्नांमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय मार्गी लागला आहे.  यापुढील काळात मिनी थिएटर, पेठमाप - मुरादपूर पुलाच्या दोन्ही बाजूच्या ऍप्रोच रोडसह अन्य विकास प्रकल्पांचाही समावेश आहे. नुकतेच शहर विकासासाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील कब्रस्थान सुशोभिकरण, रस्ते, पाखाडी गटारे, संरक्षण भिंत यासाठी २ कोटी ७५ लाखांच्या  कामांना मंजूरी मिळाली आहे. त्याबरोबर रामतीर्थ स्मशानभूमी सुशोभिकरण, गांधारेश्वर परिसर सुशोभिकरण  व सर्व प्रभागातील विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. 


गतवर्षी ठोक तरतुदीतून शहरासाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सर्व प्रभागांमध्ये ओपन जीमसाठी ९० लाख, स्विमिंग पुलासाठी ७५ लाख, अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकूलात बॅडमिंटन कोर्टसाठी ५० लाख, फुलपाखरू उद्यान विकसित करण्यासाठीही निधी मंजूर आहे. शहरातील पार्कींगची वाढती समस्या दुर करण्याकरीता ६५ लाख मंजूर झाले असून सदर कामे ही प्रशासकीय मान्यातेसाठी सादर करण्यात आली आहेत.

त्याबरोबर अल्पसंख्यांक विभागामार्पत ४०  लाखांची कामे मंजूर करून ती सध्या सुरूही आहेत. 


दरम्यान आमदार झाल्यानंतर २०१९ मध्ये पवन तलाव मैदान विकासीत करण्याकरीता १ कोटी ५० लाख, गोवळकोट मैदानासाठी १ कोटी २५ लाख, पेठमाप मुरादपूर पूलासाठी १२ कोटी, नारायण तलाव सुशोभिकरणासाठी साडेतीन कोटी अशी एकूण आमदार झाल्यानंतर ३० कोटींची कामे शहर विकासासाठी मंजूर करण्यात यश आले असल्योही आमदार निकम यांनी सांगीतले.

 
यावेळी राष्ट्रवादो प्रदेश चिटणीस जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उदय ओतारी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, वर्षा जागृष्टे, शिवानी पवार, आदीती देशपांडे आदी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत