#Satara:उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदूतांकडून वृक्षारोपण
उद्यानदूतांनकडून वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमातुन जनजागृती
महादरबार न्यूज नेटवर्क -
मुरबाड (वा) तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत व यशोदीप सामाजिक विकास संस्था, कराड संचलित उद्यानविद्या महाविद्यालय सरळगाव येथील उद्यानदूतांनी मुरबाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पऱ्हे येथे नागरिकांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्तेे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उद्यानदूतांनी काजू,आंबा, शिताफळ,चिंच,चिकु,पेरु,इ.या झाडांची निवड केली होती. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत पऱ्हे सरपंच सोमनाथ चव्हाण, उपसरपंच चंद्रकांत मोहपे, ग्रा.पं.सदस्य सिमा मोहपे, ग्रामविकास अधिकारी दिपक शिंगाडे, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षिका शमशाद शेख, लता फर्डे, महिला विकास आघाडीच्या अध्यक्षा संगिता मोहपे त्याचबरोबर उद्यानदूत संदेश आहेर, आशुतोष खुस्पे, अरुण निगुडे, वैष्णव तळेकर, रणजित झिरपे, उमेश कत्ती तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्यानदूतांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत वृक्षदिंडी काढली. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणातील वृक्षांचे महत्त्व समजावून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गावातील ग्रामस्थांना वृक्षवाटप करण्यात आले, त्यातुन "पर्यावरणाची रक्षा हीच आपली आणि ह्या संपूर्ण जगाची सुरक्षा" हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्राचार्य एस. एन. जाधव व कार्यानुभव अधिकारी एस. पी. घुले, मार्गदर्शक एस.जे.खिरारी यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment