#Natepute:शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शारदादेवी शिंदे यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालूक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी  शारदादेवी छगनराव शिंदे यांची  तर उपसरपंचपदी संग्राम  शिंदे यांची एकमताने निवड झाली.

अडिच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती ,अडिच वर्षानंतर सरपंच सूचिञादेवी शिदें व उपसरपंच सूनिल शिदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदावर, शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी चंद्रकांत शिंदे गटाच्या  शारदादेवी  शिंदे व उपसरपंचपदी मल्हारी शिंदे गटाचे . संग्राम भानुदास शिंदे यांची एकमताने
बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राठोड यांनी काम पाहीले.

या निवडी प्रसंगी शंकर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक चंद्रकांत शिंदे, मल्हारी शिंदे,माजी सरपंच सूचिञादेवी शिदे, छगनराव शिंदे,  माजी उपसरपंच विनोद रणवरे,हनुमंत  मोरे, माजी उपसरपंच सुनिल शिंदे , माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य,तसेच किरण शिंदे, अभिजित शिंदे , संतोष शिंदे , अशोक भोसले, मारूती शिंदे ,नंदकूमार मसूगडे.  गोपीनाथ शिंदे, शिवाजी शिंदे,हणमत पाटणे,सतिश देशमूख,निलेश शिंदे,सतिश शिंदे,नाना माने,आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम