#Piliv:पिलीव येथील साठवण तलावासाठी ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीस‌ प्रशासकिय मान्यता - आ. राम सातपुते

                           
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील  पिलीव  येथील  महालक्ष्मी  मंदीराजवळील  व जामदारवस्ती लवण लगत असणाऱ्या रुपांतरीत साठवण तलावासाठी  आ राम सातपुते  यांनी  राज्याचे माजी  उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहीते पाटील  यांच्या  मार्गदशनाखाली  ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या  निधीस प्रशासकीय  मिळविली आहे. त्यामुळे  पिलीव  परीसरातील  सर्वसामान्य  शेतकऱ्यांनमधुन  समाधान व्यक्त व्यक्त होत आहे. माळशिरस तालुक्यातील विविध  विकासकामांना सातत्याने  निधी उपलब्ध  करुन देणयासाठी  आ राम सातपुते  हे सतत  प्रयत्नशील असतात  नुकतेच आ राम सातपुते  यांनी २५/१५ योजनेअंतर्गत  तालुक्यातील  विविध  गावातील  वेगवेगळ्या  कामांसाठी  ५ कोटी रुपयाचा  निधी  उपलब्ध करुन  दिला आहे. आणी दोन दिवसानंतर पिलीव येथील  महालक्ष्मी  मंदीराजवळील  रुपांतरीत साठवण तलावासाठी  ४ कोटी ८५ लाख रुपये व जामदारवस्ती  शेजारील रुपांतरीत साठवण तलावासाठी  ४ कोटी ७० लाख रुपये  अशी एकुण ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या  निधीस प्रशासकीय  मान्यता  मिळाली असल्याने  या भागातील  शेतकऱ्यांनच्या  आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पिलीवपासुन २.५  किलोमीटर  अंतरावर  असणाऱ्या  या भागातील  लोकांना  सातत्याने  दुषकाळाला सामोरे जावे  लागत होते.आसपासचा परिसर हा डोंराळ असल्याने  पावसाळयात  पडणारे पाणी वाहुन जाते.मृदु व जलसंधारण विभागाकडुन आ राम सातपुते  यांच्या कडे दोन्ही  रुपांतरीत तलावाची दुरुस्ती  करण्याची मागणी  करणयात आली होती. या मागणीचा आ रामभाऊ सातपुते  यांनी सहानभुती पुर्वक विचार  करुन पुर्वीपासून  असणाऱ्या  जुन्या  तलावाची खोली करणे,दुरुस्ती करणे,अच्छादन करणे,पावसाच्या  पाणयाने तलाव भरणे,आदी उपाययोजना  करुन  तलावाची साठवण तलावाची क्षमता  वाढवुन  पाणी मुरविणे या गोष्टी  या माध्यमातून  होणार आहे. यामुळे  शेतकऱ्यांनमध्ये  आनंदाचे वातावरण  पसरले आहे. तर लोकप्रिय आमदार  रामभाऊ सातपुते यांची  या माध्यमातून  दुरदृष्टी  लक्षात  येते व शेतकऱ्यांनच्या  प्रती असणारी भावना  लक्षात येते.यापुर्वी ही आमदारांनी  शेतकऱ्यांनचा विजेचा प्रश्न, निरा देवधरच्या पाणयाचा प्रश्न, पिक  विमा योजना, अतिवृष्टीमुळे  होणारे नुकसान, दुषकाळाचा प्रश्न  असो त्यांनी शेतकऱ्यांनचे प्रश्न  प्राधान्याने  हाताळले आहेत.           

आमदार  रामभाऊ सातपुते  यांनी पिलीव व परीसरातील विविध  विकासकामांना  जवळपास  १८ ते २० कोटीचा निधी दिला आहे. या अगोदर  पिलीव भागाला एवढा विकास  निधी  कधीही मिळाला  नव्हता  परंतु  लोकप्रिय  कार्यसम्राट आमदार रामभाऊ सातपुते यांनी  एवढा निधी उपलब्ध करुन दिला  तसेच  साठवण तलावासाठी  १० कोटी रुपयाचा  निधी  उपलब्ध करुन   दिल्याने भविष्यात  शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  सुटणार आहे .      
नितीन  मोहीते  - सरपंच  पिलीव

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम