#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेत आनंद मेळावा उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कोथरूड येथील वनाझ परिवार विद्या मंदिर या शाळेत ' आनंद मेळावा' आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थी व पालकांनी खाद्यपदार्थ ,स्टेशनरी, दिवाळी साहित्य, भाज्या ,फळे, गजरे यांचे स्टॉल लावले होते. तसेच शाळेतील प्रत्येक वर्गांच्या खेळाचा एक स्टॉल लावण्यात आला होता. त्यामध्ये विविध प्रकारचे मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते . तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आकाश कंदील पणत्या सुगंधी उटणे यांचेही स्टॉल लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 'इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट' शृणाली आपटे मॅडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी  त्यांनी आनंद मेळावा उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.इनरव्हील क्लबचे सहकार्य नेहमीच शाळेला राहिले आहे.शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका अनिता दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका नीता जाधव पर्यवेक्षिका माया झावरे यांच्या सहकार्याने सांस्कृतिक समिती प्रमुख कविता कांबळे व स्वाती वाघमारे यांच्या नियोजनाखाली आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली .

या आनंद मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे ' प्रदूषण मुक्त दिवाळी' साजरी करण्यासाठी फटाके न उडवता आनंददायी दिवाळी साजरी करण्याबाबत 'स्वाक्षरी सहमतीची'  हा उपक्रम राबवण्यात आला. याचे नियोजन शिक्षिका  माया आंग्रे यांनी केले.  सहमतीच्या सहीला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
अशा प्रकारे आजचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत