Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:पिलीव येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीचा निषेध


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
भाजप आमदार  गोपीचंद पडळकर  हे इंदापूर  येथे ओबीसी  एल्गार  सभेसाठी  आले होते सभा संपल्यानंतर ते इंदापूर  येथेच सुरु असलेल्या  आंदोलन स्थळी जात असताना  मराठा समाजातील उपोषणकरत्यांनी त्याठिकाणी  आमदार  गोपीचंद पडळकर  यांच्या  विरोधात घोषणाबाजी केली  तसेच  मराठा समाजातील  काही लोकांनी  त्यांच्यावर  चप्पल फेक केली याचा आज पिलीव  येथील. समाजबांधवांनी  कडाडुन  निषेध केला आरक्षणासाठी  मराठा समाज जसा आंदोलन  करीत आहे.  तसाच ओबीसी  समाज्याला आपल्या  न्याय  हक्कासाठी आंदोलन  करणयाचा अधिकार नाही  काय असा सवाल करीत आम्ही  याचा निषेध  करीत असुन मराठा समाज जर अश्या  गैरमार्गाचा अवलंब करीत असेल तर आम्हाला  सुद्धा  जशास तसे उत्तर  देता येते अश्या  संतप्त  भावना  यावेळी  समाजबांधवानी व्यक्त केल्या.

यावेळी या निषेधावेळी कुसमोडचे सरपंच पुरुषोत्तम धायगुडे, झिंजेवस्तीचे सरपंच राहुल जावळे, कुसमोडचे माजी सरपंच तुषार लवटे, ग्रामपंचायत सदस्य  शहाजी  लेंगरे, युवा नेते शिवराज  पुकळे, संतोष  पडळकर, महादेव बंडगर, ग्रामपंचायत सदस्य  जिवन  गोरे,शहाजी वाघ,कुसमोडचे  माजी उपसरपंच  संजय पाटील,यश चोरमले,बाजीराव जाधव,अंकुश  लेंगरे यांच्या सह यावेळी  पिलीव  परीसरातील  बहुजन मोठ्या  संख्येने उपस्थित  होते.यापुढे जर बहुजन समाजातील कोणत्याही  नेते,कार्यकर्त्याला  काही केले तर जशास तसेच उत्तर  दिले  जाईल. 

Post a Comment

0 Comments