#Chiplun:देवरूख पुर येथील ग्रामस्थांचा आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
नागपूर अधिवेशन समाप्तीनंतर मतदार संघात दाखल होताच आमदार श्री.शेखर निकम सर यांनी पक्षप्रवेशाचा धडाका पुन्हा सुरू केला आहे.आज देवरुख पूर येथील शेकडो ग्रामस्थांनी आमदार श्री.निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.या प्रवेशाने देवरुख राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळाले आहे.
             
गावागावात सुरू असलेली विकासकामे आणि मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होत मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वाडीवस्तीवर जात असल्याने मतदारांनी झुकते माप आमदार श्री.शेखर निकम सर यांच्या पारड्यात टाकले असल्याचे दिसत असून यातूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत.आज देवरुख पूर येथील शेकडो ग्रामस्थानी आमदार श्री.शेखर निकम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये रामचंद्र झेपले,महेश झेपले,चंद्रकांत झेपले,हनुमंत घुणे,संतोष भोसले,माजी सरपंच संजय झेपले,तेजस झेपले,योगेश झेपले,सौरभ झेपले,ग्रा.पं सदस्य पूजा झेपले,संध्या झेपले,सविता झेपले,कविता फुगे,ग्रा.पं सदस्य तबसून खाचे,वरद झेपले,स्वाती झेपले,मनोहर झेपले,वासुदेव घुने,रविना झेपले,अनिता झेपले,ममता झेपले आदी सह शेकडो ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
          यावेळी राष्ट्रवादी देवरुख तालुका उपाध्यक्ष श्री.अमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली या साऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष श्री.दिलीप गोवळकर उपस्थित होते.
  यावेळी आमदार श्री.शेखर निकम यांनी या साऱ्यांचे आभार व्यक्त करताना म्हटले की तुम्ही विश्वासाने माझ्यासोबत आला आहात विकासाची कामे होतच राहणार आहेत मात्र आपण आपले एक कुटूंब म्हणून गावाच्या विकासासाठी काम करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम