#Pune:कर्वेनगर येथे चिपळूण तालुका धनगर समाजाच्या वतीने धनगर चषक कबड्डी स्पर्धा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
चिपळूण तालुका धनगर समाज पुणे आयोजित धनगर चषक २०२३ भव्य कबड्डी स्पर्धा नुकत्याच पुणे येथील कर्वेनगर येथे पार पडल्या. सदर कबड्डी स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते.
    
सम्राट अशोक विद्यालय कर्वेनगर पुणे येथे रविवार दि. २४ रोजी सकाळी ७ ते ९ चिपळूण तालुका धनगर समाज पुणे आयोजित धनगर चषक २०२३ भव्य कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यावेळी विजेत्यांना रोख व चषक प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेस चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
     
यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना शेखर निकम यांनी सांगितले की, चिपळूण संगमेश्वर येथील धनगर समाज दुर्गम भागात राहतो त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मेळाव्यात म्हणून अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी मागणी करत आहे. शहरातील धनगर समाज बऱ्यापैकी शिकलेला आहे परंतु कोकणातील धनगर समाजातील मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्कॉलरशिप सारख्या सुविधा देऊन व चांगल्या शाळा कॉलेज मध्ये चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. देवरुख सारख्या ठिकाणी लवकरात लवकर जागेचा प्रश्न सोडवून धनगरांचे समाज मंदिर बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलांना तिथे अभ्यासासाठी फायदा होईल तसेच इतरांनाही त्याचा उपयोग होईल. पुण्यासारख्या शहरी भागात कबड्डी स्पर्धा भरवून धनगर समाजाने जी एक ही दाखवली आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
    
सदर भव्य कबड्डी स्पर्धेत लक्ष्मण पवार, विलास गुरव, अध्यक्ष शांताराम येडगे, उपाध्यक्ष परशुराम खरात, रामकृष्ण गोरे, महादेव खरात, अनंत कोकरे, रामचंद्र वरक, विनोद वरक, लक्ष्मण येडगे, बाबू खरात, बाबू बोडेकर, बारकू खरात, रामचंद्र शेळके, विलास खरात, संजय बावधाने, मंगेश  कोकरे, सुनील गोरे, रूपाजी गोरे, प्रशांत येडगे, विकास बरक, मधुकर जानकर आदी धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत