महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस येथे भारतीय मातंग युवक संटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांच्या नेतृत्वाखालील माळशिरस पंचायत समिती माळशिरस येथे एक दिवसीय लक्षणीय उपोषण व एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागण्या 1)मांडवे ता - माळशिरस येथील मनमानी कारभार करणाऱ्या व कामाच्या वेळेत दांड्या मारणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. 2) मांडवे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. 3)मांडवे येथील आरोग्य उपकेंद्रातील डाॅक्टरांनसाठी बांधलेल्या निवासाची दुरूस्ती करण्यात यावी. 4)माळशिरस तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्रात बायोमेट्रिक हजेरी घ्यावी व बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी 5) दहिगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करून. प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे .या वरील विषयावर तात्काळ योग्य निर्णय घेऊन योग्यती कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी सोहन लांडगे , विशाल खुडे , अमित खिलारे , मुकेश लांडगे , ओम पवार, सुरज खिलारे आदी उपस्थित होते . या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते यांनी निवेदन स्वीकारले.
0 Comments