Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:सावर्डेमध्ये विज्ञान दिंडीने विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ

जिजाऊ,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज व शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अशा विविध वेशभूषांनी वेधले लक्ष

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
ढोलताशांचा गजर,लेझीम पथकाच्या सादरीकरणाने सावर्डे बाजारपेठ व परिसरामध्ये काढलेल्या विज्ञान दिंडीने ५१ व्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ झाला.यामध्ये महाराष्ट्रीय,दाक्षिणात्य,पंजाबी पोशाखांनी सजलेल्या मुलामुलींच्या वेशभूषांनी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.याप्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
               
राज्यविज्ञान शिक्षण समिती नागपूर,माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद रत्नागिरी आणि सह्याद्रि शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.त्याची सुरुवात थोर शास्त्रज्ञ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रतिमा व ग्रंथ पूजनाने झाली.विज्ञान दिंडीमध्ये जिजाऊ,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज व शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,अंतराळवीर कल्पना चावला,गणिततज्ञ आर्यभट्ट,सी.व्ही.रमण,संत ज्ञानेश्वर इ.वेशभूषा साकारल्या होत्या.विज्ञान दिंडीमुळे परिसरातील समाजामध्ये जागृती होण्यास मदत झाली.विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.परिसरातील बहुसंख्य शाळा या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत.
               
याप्रसंगी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार श्री.शेखर निकम,अध्यक्ष बाबासाहेब भुवड,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत,गोपाळ चौधरी,उपशिक्षण अधिकारी रत्नागिरी,गटशिक्षण अधिकारी चिपळूणचे श्री.दादासाहेब इरनाक,सावर्डे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जयंत गायकवाड,सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सचिव श्री.महेश महाडिक,संचालक श्री.शांताराम खानविलकर,चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती व सदस्य पूजाताई निकम,अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ श्री.रविंद्र इनामदार,विस्तार अधिकारी राजअहमद देसाई,सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments