महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले बालिका दिनाच्या औचित्य साधून किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगिता निटवे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे बालरोगतज्ञ डॉ .दत्तात्रय निटवे हे याप्रसंगी उपस्थित होते.व याप्रसंगी कोमल सिस्टर व आतार सिस्टर उपस्थित होत्या.कार्यशाळेत डॉ. निटवे यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी संदर्भातील स्वच्छता, आहार, व्यायाम, तणाव व्यवस्थापन तसेच आत्मविश्वास वाढवण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विविध मॉडेल्सच्या साह्याने केलेले मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरले. “स्वतःच्या शरीराविषयी योग्य माहिती व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे आरोग्यदायी जीवनाचे पहिले पाऊल आहे,” असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. निटवे यांनी अत्यंत समजूतदारपणे उत्तरे देत अनेक गैरसमज दूर केले. कार्यशाळेदरम्यान संवादात्मक पद्धतीने दिलेले मार्गदर्शन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरले.शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. लक्ष्मण पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत मुलींच्या शिक्षणासोबतच आरोग्यजागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद यांचे विशेष योगदान लाभले.ही कार्यशाळा किशोरवयीन मुलींसाठी उपयुक्त, मार्गदर्शक व आत्मविश्वास वाढवणारी ठरली.कार्यक्रमाचे संयोजन मनीषा पवार, सुनंदा पवार यांनी केले.
0 Comments