महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक २६.१.२०२६ रोजी एक दिवशीय लक्षणीक अकरा ते पाच या वेळेत अण्णा सेना प्रतिष्ठानचे लोकशाही मार्गाने उपोषण उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालय समोर केले जाणार आहे.
२६.८.२०२५ रोजी अण्णा सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज कार्यालय यांना नातेपुते पोस्ट ऑफिस गेले पन्नास वर्षांपूर्वीचे असून जीर्ण झाले आहे त्याचे स्थलांतरित करण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन दिले असता संबंधित अधिकारी यांनी त्या जनहितार्थ निवेदनाची दखल न घेतल्यामुळे अण्णासेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री अमित भिंगारदिवे (समाज सेवक)व अण्णा सैनिक श्रावण खडके व इतर सैनिक यांच्या उपस्थितीत उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज कार्यालय यांना निवेदन देण्यात आले.
नातेपुते पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक २६.१ .२०२६ रोजी उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालय समोर ११ ते ५ या वेळेत लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाणार आहे सदर या जनहितार्थ निवेदनाची दखल घ्यावी व लवकरात लवकर नातेपुते पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी अण्णा सेना च्या वतीने निवेदनात केली आहे.
0 Comments