महादरबार न्यूज नेटवर्क -प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षपदी अशोक जाधव तर उपाध्यक्षपदी वंदना इरकर यांची निवड करण्यात आली.
विद्यमान अध्यक्ष बाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन व अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आल्या. तसेच शिक्षणप्रेमी म्हणून संदिप भैस व सचिव म्हणून शिक्षिका सुचित्रा रेड्डी यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून दिपक जाधव, युवराज पाटील, संदिप जाधव, बाबा फुले, बाजीराव जाधव, संतोष नवले, सरिता पिसे, दिपाली जाधव, सुप्रिया एकतपुरे यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी दत्तू जाधव, शंकर जाधव, वसंत जाधव, भिमराव जाधव, सिध्देश्वर जाधव, रामचंद्र एकतपुरे, सुनिल पिसे यांसह पालक उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत व आभार शिक्षक चंद्रकांत धसाडे यांनी मानले.
0 Comments