#Natepute:शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माळशिरस तालुका प्रमुख ग्रामीण परिक्षेत्राच्या निवडी जाहीर
महादरबार न्यूज नेटवर्क -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंद खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खा. डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे कक्ष प्रमुख रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे, भूषण सुर्वे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील
माळशिरस तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समीर सलीम शेख (माळशिरस तालुका प्रमुख शहर परिक्षेत्र )
संजय तानाजी दणाने (माळशिरस तालुका उपप्रमुख ग्रामीण परिक्षेत्र)
गणेश आनंदराव वाघमोडे (माळशिरस तालुका प्रमुख ग्रामीण परिक्षेत्र ) विशाल आप्पासाहेब लांडगे (नातेपुते शहर प्रमुख)
राहुल विठ्ठल आडगळे (नातेपुते शहर उपप्रमुख)
संतोष नामदास मचाले (माळशिरस तालुका उपप्रमुख शहर परिक्षेत्र)
यांच्या निवडी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य विभागातून जाहीर झाल्या असून सदर विभागातून आलेले निवडीचे पत्र माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते नातेपुते येथील शिवसेना कार्यालयात निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली.
यावेळी नातेपुते उपशहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे, नातेपुते गटप्रमुख राहुल आडगळे, फोंडशिरस गटप्रमुख अनिल दडस, शिवराज पलंगे, फोंडशिरस शाखाप्रमुख संतोष गोरे आधी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीच्या पत्रामध्ये म्हटले आहे की निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा असून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%+१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा.
Comments
Post a Comment