#Natepute:नातेपुते येथे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि बानू यांच्या शुभविवाह सोहळ्याचे आयोजन



महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील समस्त धनगर समाजाच्या वतीने  अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि बानू ) यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त मित्ती पौष शु. १२ शालीवाहन शके १९४५, सोमवार दि. २२/१/२०२४ रोजी सायं. ६.१५ मि. या गोरज मुहुर्तावर  आयोजन करण्याचे योजिले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे.सोमवार दि. २२/१/२०२४ रोजी पहाटे ५.०० वाजता.श्री गणेश पुजन , पहाटे ५.३० वाजता पुण्याहवाचन ,सकाळी ६.०० वाजता.अभिषेक दुपारी ४. ३० वा.हळदी समारंभ सायं. ६.१५ वा.विवाह सोहळा सायं. ६.३० वा. यासाठी लाडू प्रसाद वाटपाचे प्रायोजक : श्री. अमोल गजानन पाडसे यांनी केले आहे. .सायं. ७.१५ वा.साडं कार्यक्रम ,रात्री. ९.०० वा.जागरण गोंधळाचा कार्यक्रमाचे प्रायोजक : श्री. कुंडलिक गणपत उराडे (काका) यांनी केले आहे.सदर विवाह सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे,अशी विनंती समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम