#Malshiras:माळशिरस मराठी पत्रकार यांची दिनदर्शिका नागरिकांच्या पसंतीस


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुका मराठी पत्रकार यांनी प्रकाशित केलेली २०२४ या वर्षाची दिनदर्शिका सूट सुटीत डिझाईन,आकर्षक कलर ,सुबक छपाई केल्याने हि दिनदर्शिका कार्यालयीन, व्यवसायिक तसेच घरगुती  ठिकाणी लावण्यासाठी अनेकांच्या पसंतीस आली असून त्याची मागणी वाढली आहे.माळशिरस तालुका मराठी पत्रकार यांचे दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे पहिले वर्ष असल्याने  त्यांच्या 1 हजार प्रतिचे फक्त छपाई करण्यात आल्याने आणि मागणी वाढल्याने  तुटवडा भासत आहे.

नुकतेच या दिनदर्शिकीचा प्रकाशन कार्यक्रम माळशिरस पंचायत समिती सभागृह मध्ये गटविकास अधिकारी विनायक गुळवे,निवाशी नायब तहसीलदार अमोल कदम,सह.गट विकास अधिकारी किरण मोरे, माळशिरस नगरपंचायतीचे मा.नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,बाळासाहेब सरगर,पांडुरंग वाघमोडे,विकास धाईंजे,सोमनाथ वाघमोडे,अजित बोरकर,बाबासाहेब माने,शिवराज पुकळे,अनंतलाल दोशी,महादेव कोळेकर,सचिन वावरे,नागेश वाघमोडे,सोमनाथ पिसे यांच्यासह माळशिरस तालुका मराठी पत्रकार बांधव स्वप्नील राउत,बंडू पालवे,तानाजी वाघमोडे,शोभा वाघमोडे,संजय हुलगे,हनुमंत माने,विलास भोसले, जाहिरातदार,हितचिंतक यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू पालवे ,सूत्रसंचलन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले तर आभार आनंद शेंडगे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम