#Natepute:गावांची ओळख हि आर्थीक चारीञ्यावर अवलंबून असते - आमदार राम सातपुते
महादरबार न्यूज नेटवर्क -
गावाची ओळख ही आर्थीक चारीञ्यावर अवलंबून असते,त्यामुळे बळीराजा पतसस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांच्या मदतीस उतरून तसेच श्रीराम ठेव योजनेच्या माध्यमातून नातेपुते नवी ओळख निर्माण करेल असे मत आमदार राम सातपुते यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 20 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता श्री राम ठेव योजनेचा शुभारंभ 20 जानेवारी 2024 रोजी आमदार राम सातपुते याच्या हस्ते करण्यात आला.
नातेपुते येथे बळीराजा पतसंस्थेचा तीन महिन्यापूर्वी शुभारंभ केलेला होता. संचालक मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक यांनी तीन महिन्यात एक कोटी पेक्षा जास्त ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटपातसुद्धा कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे.
सध्या देशामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध स्तरांवर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्रीराम ठेव योजना सुरू करण्यात येत आहे. सदरच्या ठेवीवर 13 महिने ते दोन वर्षाच्या ठेवीवर अर्धा टक्का पतसंस्था देणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार रामहरी रुपनवर,धैर्यशील देशमूख,अॅड.डी.एन.काळे,नगराध्यक्ष अनिता लांडगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख,बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष काळे,व्हा.चेअरमन बाळासाहेब पांढरे,नगरसेवक अॅड बी.वाय.राऊत,अॅड, रावसाहेब पांढरे,रणजित पांढरे,अतूल बावकर,बाहूबली चंकेश्वरा,अॅड अॅड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,अर्जूनदादा जठार,संपतराव पांढरे,गणपतराव पांढरे,संजय उराडे,मोहन वाघमोडे,राहूल पद्मन,वैभव शहा,दत्ताञय रूपनवर,सौ.अनिता काळे,सौ.भारती सोलनकर,ज्ञानेश्वर सरक,संचालक,सभासद ,ठेवीदार,कर्जदार,मोठ्यां संख्येने उपस्थीत होते .सूञसंचालन औदूंबर बूधावले यांनी केले तर आभार वैभव शहा यांनी मानले.
Comments
Post a Comment