महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालूक्यात गावागावातील विकासकामांसाठी मोठया प्रमाणात निधी वितरीत केल्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे गावागावांत झालेल्या विकासकामांचा आढावा आणि सध्यस्थितीत सुरू असलेली तथा मंजूर असलेली विकासकामे आणि प्रस्तावित कामांसदर्भात मुंबईकर ग्रामस्थांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आमदार निकम यांनी गेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईत प्रत्येक जिल्हा परिषद गटा मेळावा घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर या जिल्हा परिषद गटांचा मेळावा विराट गर्दीत झाल्यानंतर आता कोसूंब जिल्हा परिषद गट आणि मतदारसंघात समाविष्ठ असलेला कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा रविवारी दादर येथे होत आहे.
कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणात आमदार निकम यांच्या माध्यमातून सुमारे ९० कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रविवारच्या मेळाव्यात या गट आणि गणातील प्रत्येक गावातील विकास कामांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी आमदार शेखर निकम हे मार्गदर्शन करणार असून यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई शहर अध्यक्ष समीर भुजबळ व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला मुंबईकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आले आहे.
0 Comments