#Chiplun:आगवे गावातील विकास कामांची भूमीपुजन आ. शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

आगवे गावातील ग्रामस्थांनो  अडचणीच्या काळात कधीही मला हाक मारा आपली अडचण सोडवण्यास मी सदैव तत्पर असेन - आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

चिपळूण तालुक्यातील आगवे गावातील विकास कामांच्या भूमीपुजन कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम सर यांची उपस्थिती लाभली  व मोठ्या उत्सहात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमीपुजने संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचा सत्कार करुन त्यांचे मन:पुर्वक आभार मानले.

आमदार शेखर निकम यांनी विविध योजनेतून मंजूर केलेली कामे मौजे आगवे हुमणेवाडी येथे  नविन अंगणवाडी  इमारत  बांधणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. - (डोंगरी  विकास  कार्यक्रम योजना सन ) - 5 लाख, मौजे आगवे हुमणेवाडी रस्ता डांबरिकरण करणे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी. - (25/15 योजना सन) - 5 लाख, मौजे आगवे हुमणेवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ता. चिपळूण,  जि. रत्नागिरी. - (आमदार स्थानिक विकास कर्यक्रम )  - 3 लाख, मौजे आगवे बौद्धवाडी राणीमवाडी हुमणेवाडी शाखेसह रस्ता सा. क्र. 0/600 ते 2/00 (ग्रामा 88),  ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. – (30/54  ‘गट’ ब योजना ) - 10 लाख, मौजे आगवे बौद्धवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी. - (आमदार स्थानिक विकास कर्यक्रम ) - 5 लाख, मौजे आगवे बौद्धवाडी रस्ता राणीमवाडी हुमणेवाडी शाखेसह रस्ता सा.क्र. 1/00 ते 5/00 ग्रामा 88, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. – (3054 गट-ब व गट-क योजना ) - 10 लाख, मौजे आगवे मधलीवाडी ते कापशीचा माळ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. – (कोयना भुकंप सन ) - 5  लाख, मौजे आगवे हुमणेवाडी येथे साकव बांधणे, ता. चिपळूण,  जि. रत्नागिरी. – (जिवायो ग्रामिण साकव कार्यक्रम सन ) - 25 लाख, मौजे आगवे बौद्धवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, ता. चिपळूण,  जि. रत्नागिरी. – (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास सन ) - 8 लाख, आगवे बौद्धवाडी रस्ता राणीमवाडी हुमणेवाडी शाखेसह रस्ता ग्रामा 88 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. चिपळूण. – (जिवायो ग्रामिण रस्ते विकास सन ) - 10 लाख, आगवे बौद्धवाडी राणीवाडी हुमणेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. चिपळूण,  जि. रत्नागिरी. - (बजेट सन 2023-2024) - 30 लाख यापैकी कामपूर्ण झाले आहेत तसेच उर्वरीत कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

आमदार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करताना आगवे गावाबाबत म्हणाले की, आगवे हे माझे गाव असुन, स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब यांच्या राजकीय कारकिर्दी पासुन ते अगदी मी आमदार झालो आणि अजूनही अगदी विश्वसनीय साथ लाभली आहे. या गावाशी माझं कौटुबिक नातं अगदी पुर्वी पासून आहे हे आपण जाणता. आपण सांगितलेले विकास कामे तसेच अडचणीच्या काळात आपणाला लागणारे सहकार्य कधी होणार नाही अस कधीच होणार नाही. आपण ग्रामस्थांनी मला केव्हाची अडचणीच्या काळी हाक मारा मी सदैव तुमच्या सोबत असेन. आपण सांगितलेली बरीचशी विकास कामे मार्गी लावली आहेत आणि जी राहीली आहेत ती पुढील काळात नक्कीच पुर्ण करीन असे मी सर्व ग्रामस्थांस विश्वास देतो.

यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, माजी सरपंच खेर्डी दशरथ दाभोळकर, जयंत घडशी (सरपंच), मिनल जाधव (उपसरपंच), अनिकेत भंडारी (सदस्य), निलेश हुमणे (सदस्य), राजकुमार गावणंग (सदस्य), सोनाली चव्हाण (माजी सरपंच), प्रशाली राणीम (सदस्य), वैष्णवी निर्मळ (सदस्य), भागवत (ग्रामसेवक), मारुती हुमणे (तंटामुक्ती अध्यक्ष), बाबासाहेब भुवड, श्रीराम हुमणे, जयराम हुमणे, विठ्ठल हुमणे, बंडू भुवड, मुंकुद भुवड, भाई गावणंग, संतोष खांबे, राजेंद्र हुमणे, संदेश जाधव, मारुती राणीम, शांताराम जाधव, ठेकेदार प्रथमेश निकम व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम