#Natepute:नातेपुते येथे सरकारची मराठा समाजाच्यावतीने अंतयाञा काढून केला अंतविधी
महादरबार न्यूज नेटवर्क -
जरांगे पाटील काही दिवसापासून उपोषणास बसले आहेत!त्यामूळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.जरांगे पाटलांना पाठींबा देण्यासाठी व सरकारचा निषेध करण्यासाठी नातेपुते येथे सकल मराठा समाजाने मूख्यमंञि,उपमूख्यमंञी अनेक मंञी यांची पोस्टरची अंतयाञा काढून येथील शिवाजी महाराज स्मारकासमोर चिता रचून त्यावर ती चिता पेटवून देण्यात आली,यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. एकजूट करा,सघर्ष करा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कूणाच्या बापाचे,नालायक सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी आसमंत दूमदूमून गेला.
तसेच आरक्षणाचाबाबत शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा,मराठा आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लावावा.अशा भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्या,
या प्रसंगी नातेपुते परीसरातील सकल मराठा समाज मोठ्या सख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment