#Malshiras:कुसमोड येथील जि प प्राथमिक शाळा लक्ष्मीनगरचे वार्षीक स्नेहसंमेलन दिमाखात साजरे
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि प प्राथमिक शाळा लक्ष्मीनगरचे वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व स्व ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतीमेचे जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील, माजी जि प सदस्य गणेशदादा पाटील, केंद्रप्रमुख राजकुमार फासे, कुसमोडचे सरपंच महावीर धायगुडे, उपसरपंच स्वाती मदने, माजी सरपंच तुषार लवटे, माजी उपसरपंच राणी पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्षा रुपाली मदने ,मुख्याध्यापक सुहास कोल्हे या मान्यवरांच्या हस्ते करणयात आले.
यावेळी मुख्याध्यापक सुहास कोल्हे यांनी प्रास्तविक केले यामध्ये लोकसहभागातून शाळेची सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले तर माजी जि प सदस्य गणेशदादा पाटील यांनी या शाळेसाठी स्व ज्ञानेश्वर पाटील यांनी दहा गूंठे जागा दिली तसेच शाळेच्या उभारणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली यामुळेच आज याठिकाणी ही शाळा दिसत असल्याचे सांगितले. तर जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील यांनी शाळेच्या उर्वरित संतक्षक भिंत व सभामंडपावर पत्रा टाकण्यासाठी पाच लाख रुपये निधी देणार असल्याचे सांगितले. सरपंच महावीर धायगुडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.तसेच केंद्रप्रमुख राजकुमार फासे यांनी या शाळेच्या गुणवत्ता व भौतीक सुविधा याचे कौतुक केले. जि प लक्ष्मीनगर शाळेतील तसेच अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. सदरच्या कार्यक्रमास कुसमोडच्या माजी सरपंच शशीकला लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण धायगुडे, अज्ञान धायगुडे, माळशिरस तालुका शिक्षक सोसायटीचे चेअरमन अशोक पवार, संचालक अमोल नष्टे, सचिन गाटे, किरण काळे, केंद्र प्रमुख राजु गोरवे,रमेश सरक,पंढरीनाथ लेंगरे, राजेंद्र सुरवसे, विजय धायगुडे, जे के रजपुत, राजु चौरे, नागनाथ शेटे, ढोले सर ,औटी सर,विनायक आर्वे, इरकर सर तसेच पिलीव गावचे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव जरग,पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल नष्टे, दामोदर लोखंडे, गणेश देशमुख ,माजी अध्यक्ष लक्ष्मण पवार, देवीदास पाटील, पिलीव विकास सेवा सोसायटीचे संचालक विठ्ठल मदने सर,नबाजी मदने ,धनाजी मदने,यांच्या सह कुसमोड लक्ष्मीनगर परीसरातील पालक, ग्रामस्थ ,माजी विदयार्थी शाळा व्यवस्थापन समीतीचे आजी माजी सदस्य या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामेश्वर झाडे यांनी सुत्रसंचालन केले तर सहशिक्षक सुनील डुरे व अंगणवाडी सेविका सत्यभामा मदने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment