Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:महादरबार न्यूज च्या बातमीच्या दणक्याने यवतला सेवा रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा बुजवला


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे सोलापूर हायवे वरील यवत सेवा रस्त्यावर अलंकार शॉपिंग सेन्टर समोर एक मोठा खड्डा पडलेला होता व त्या खड्ड्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना तसेच दुचाकी चालकांना तो खड्डा चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती तसेच छोटे अपघात देखील झाले होते.


महादरबार न्यूज ने यवतला सेवा रस्त्याची झाली दुरवस्था रस्त्यावर पडलेले आहेत खड्डे, अशी बातमी दिली होती. या बातमीची दखल घेऊन पाटस टोल प्रशासनाने तो खड्डा बुजवला हा खड्डा बुजवल्या गेल्यामुळे नागरिकांनी व दुचाकी स्वरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Post a Comment

0 Comments