#Natepute:नातेपुते येथील शंकरराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयास पुणे बोर्डाचे राजेंद्र जावीर साहेब यांची सदिच्छा भेट
महादरबार न्यूज नेटवर्क -
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पर्शवभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चे प्रशासकीय अधिकारी सन्मानीय श्री. राजेंद्र जावीर साहेब यांनी महाविद्यालयाच्या परीक्षा पूर्वतयारी बाबत पाहणी केली. यावेळी मा. जावीर साहेब यांनी महाविद्यालयाची व परीक्षा प्रशासनाची स्तुती केली. हे सहकार महर्षींचे कॉलेज आहे व मला येथील कामकाजाबाबत पूर्ण विश्वास आहे असे मत जावीर साहेब यांनी व्यक्त केले. येथील परीक्षा डिजिटल पद्धतीने घेतल्या जातात, स्टिकर पद्धतीने नम्बरिंग केले जाते, ऑनलाइन गैरहजेरी रिपोर्ट वेळेत भरले जातात, भयमुक्त व 100% कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घेतली जाते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर यांनी केले.
इयत्ता 12 वी परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक प्रा. बापूराव वाघमोडे यांनी परीक्षा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. मा. जावीर साहेब यांचा सत्कार समारंभ पार पाडून कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रा. अनिल घेमाड, प्रा. हसन मोगल व प्रा. सचिन माळी सोबत इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या प्रा. सौ. पुष्पा सस्ते यांनी व आभार प्रदर्शन प्रा. नारायण माने यांनी केले.
Comments
Post a Comment