#Chiplun मिरज-कोल्हापूर-माखजन बससेवा सुरू; आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
माखजन येथील प्रवाशांना सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी जाण्याकरिता सोयीचे व्हावे म्हणून मिरज-कोल्हापूर-माखजन बस सेवा सुरू होत असून या कामी तालुक्याचे आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान लाभले आहे.
     
माखजन येथे मध्यवर्ती बस स्थानक असून येथूनच ग्रामस्थांना मुंबई-गोवा महामार्गावर जावे लागते. यापूर्वी सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी जाण्याकरिता प्रवाशांना बस बदलावी लागत असे. कोल्हापूर, सांगली, मिरज येथे वैद्यकीय उपचारासाठी असंख्य लोकांना जावे लागते. थेट बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे आजारी रुग्णांना वेळेचा व आर्थिक फटका बसत होता. माखजन येथे पुणे, गुहागर, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणच्या बसेस मुक्कामासाठी होत्या. त्यामुळे मिरज, सांगली, कोल्हापूर मार्गे देखील बस सुरू करून माखजन येथे मुक्कामी थांबवावी अशी दशक्रोशीतील वीस गावातील लोकांनी मागणी केली होती.
     
माखजनकरांच्या या मागणीचा विचार करून ग्रामस्थांची व येथील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी येथील कार्यक्षम आमदार शेखर निकम यांनी शासन दरबारी गाऱ्हाणे मांडले व मिरज-कोल्हापूर-माखजन बससेवा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
     
हि बससेवा मिरज वरून सांगली, जयसिंगपूर, बांबवडे, मलकापूर, आंबा, साखरपा, देवरुखमार्गे माखजन अशी धावणार आहे. हि बस मिरज वरून दुपारी १:३० मिनिटांनी व माखजन वरून सकाळी ६:३० मिनिटांनी सुटणार आहे.
     
सदर बससेवा सुरू करण्यासाठी माखजन ग्रामपंचायतचे  सरपंच महेश बाष्टे, संतोष पाडळक, किशोर तांबट, नितिन सागवेकर, मनोज दळी, रामचंद्र कदम, काका तांबे, कैलास कुंभार, संतोष गोटेकर, सुरेंद्र कोळबेकर, अनंत पाठगावकर, योगेश पेणकर, बारकु कदम, दिपक कुंभार, राम मोहिते, प्रतिभा चव्हाण, पुजा पवार यांचेदेखील मोलाचे योगदान लाभले आहे. मिरज-कोल्हापूर-माखजन बससेवा सुरू करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे व आ. शेखर निकम यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम