Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute ग्रामीण शिक्षण संस्था सांस्कृतिक वारसा चांगल्या प्रकारे जपतात - अर्जुनसिंह मोहिते पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था सांस्कृतिक वारसा चांगल्या जपताता,ही संस्था लहान मुलांच्या कलागूणाना वाव देत असून मुलांचा सर्वांगीण  विकासास यामूळे हातभार लागत असल्याचे मत माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जूनसिंह मोहीते पाटील यांनी व्यक्त केले.


ते नातेपुते येथील एस.एन.डी इन्टरनॅशनल सीबीसी  स्कूलमध्ये आयोजित स्वरगंधा ०.३ या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख होते.
प्रारंभी  सहकारमहर्षी शंकरराव मोहीते पाटील व समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या प्रतिमाचे पूजन करुन कार्यक्रमास सूरू करण्यात आली कार्यक्रमात  चिमुकल्यांनी  आपली कला सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली यावेळी पालकांसह मूलांना बेस्ट अर्वाडने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले, या शाळेवर पालकांनी विश्वास ठेऊन मूलांना शाळेत पाटवून खाऱ्या अर्थाने विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी  अनेक योजना आणून मूलांच्या  सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयन्तशील राहील.


या कार्यक्रमास माजी सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील,माजी उपसभापती अर्जूनसिंह मोहीते पाटील,बाबाराजे देशमूख, सूचिञादेवी देशमूख, नगराध्यक्षा अनिता लांडगे, एस.एन.डी. स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमूख,ना .ए.सो.चे चेअरमन धैर्यशील देशमूख, डाॅ.एम.पी.मोरे.महेश शेटे, अॅड.बी.वाय.राऊत, अॅड शिवाजीराव पिसाळ, अमरशील देशमूख, नाथाजीराव देशमूख, अतूल बावकर, रणविर देशमूख,  रोहीत शेटे, विश्वजित पिसाळ, अर्जून जठार, वामन पलंगे, विलास काळे, नगरसेवक उत्कर्षाराणी पलंगे,रणजित पांढरे,भारती पांढरे,स्वाती बावकर,माया उराडे,रावसाहेब पांढरे,धनाजी देशमूख, प्राचार्य संदिप पानसरे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments