Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat यवत येथील यात्रेची या मातब्बर च्या कुस्तीने सांगता


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील यात्रेची सांगता सागर बिराजदार व बाला रफिक शेख व  त्यांच्या कुस्तीने झाली. १ लाख २५ हजारची शेवटची कुस्ती झाली . यात्रा दोन दिवस चाललेल्या यात्रेत २४ व २५ ला श्री काळ भैरवनाथ महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेत  सर्व प्रकारची दुकाने व स्टॉल लागलेले होते. यवत पुणे सोलापूर रोडवरील मोठे गाव असल्यामुळे यात्रेला गर्दी  होती , यात्रेत मिठाईचे व खेळण्याची दुकाने भरपूर होती . बाजार मैदान स्टॉलनी भरून गेलेला होता.


यवत येथील यात्रेत पाळणे राडगाडे अनेक प्रकारच्या सिस्वा व असे लहान मुलांना खेळण्यासाठी आलेले होते यात्रेत उलाढाल खूप प्रमाणात होत असते. त्यामुळे बाहेरून सुद्धा नागरिक यात्रेला लोक येत असतात. यात्रेत पहिल्या दिवशी सर्व कार्यक्रम देवाचे कार्यक्रम झाल्यानंतर शनिवारी रात्री मंगला बनसोडे करवडीकर ,नितीन बनसोडे करवडीकर यांचा  लोकनाट्याचा कार्यक्रम झाला व दुसऱ्या दिवशी हजऱ्या चा कार्यक्रम २५तारखेला झाला.  विनोद ,रंगबाजी, वग , कार्यक्रम झाले. दुपारी पाच वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली या कुस्त्यांमध्ये शेवटचा पाच मानाच्या कुस्त्या झाल्या.

कुस्त्या च्या आखाड्यात प्रामुख्याने यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदानंद दोरगे , काळभैरव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे , श्रीपती दोरगे , शंकरराव दोरगे , दिलीप दोरगे , संजय दोरगे , चंद्रकांत दोरगे , आबासाहेब दोरगे , नानासाहेब दोरगे , दत्तात्रय दोरगे , आण्णासाहेब दोरगे तसेच कुस्ती समालोचक किसन काळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments