#Natepute सिंघम स्टाईल परजणे साहेबांची दमदार कामगिरी, 3लाख रूपयांचे मोबाईल शोधून दिले मूळ मालकांना परत


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीतील अॅपलसारखे मोबाईल चोरीला गेले होते.यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे १२मोबाईल सापडले असून त्यांची किंमत २,९०,४९०रू असून ते सर्व मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आल्याची माहीती नातेपुते पोलिस स्टेशन सपोनि महारूद्र परजणे यांनी दिली.

६फेब्रूवारी रोजी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये सत्यजित मदनकूमार जोशी (रा,नातेपुते) यांनी फिर्याद दाखल केली होती.त्या गून्हाचा तातडीने तपास करून अल्पावधितच  आरोपी उमेश पोपट लोंढे(रा.बरड,ता.फलटण.जि.सातारा)या अटक करुन त्याच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले.
यापुर्वी अनेकवेळा बाजारतळ,शहर,तसेचग्रामीण  भागातून मोबाईल चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या.होत्या.त्यांची तातडीने दखल घेऊन सायबर सेलच्या मदतीने तपास करून .२,९०,४९०,रू किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

विशेष पोलिस महानिरीक्षक सूनिल फूलारी,पोलिस अधिक्षक शिरीश देशपांडे,अप्पर पोलिस अधिक्षक प्रीतम यावल,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महारूद्र परजणे,ए.स,आय.गडदे,पोलिस काॅस्टेबल रणजित मदने,शिवानंद सोनवणे,संतोष वारे,गणेश कापसे,प्रमोद तोरणे,सायबर सेलचे पोलिस निरीक्षक विकास दिंडोरे,सचिन राठोड,यांनी तांञीक विश्लेषण करूण सायबर सेल सोलापूर यांच्या मदतीने  तपासाची चक्रे फिरवून अल्पावधीतच या मोबाईल चोरीचा तपास लावल्याने नातेपुतेसह परीसरातून पोलिसांचे कौतूक हौत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम