महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत मंजूर
दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्याद्वारे दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशांचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये मौजे रावणगाव, ता. दौंड येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे खालील मयत शेतकऱ्यांचा कुटुंबियांना मदत मिळाली -
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. राहुल माने , भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. अरुण आटोळे ,भाजपा नेते श्री. तानाजी दिवेकर, भीमा पाटसचे संचालक श्री. विकास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments