#Baramati चंदुकाका सराफ मध्ये रिंग व चैन महोत्सवाला मिळणार भरपूर प्रतिसाद - सरपंच जुई हिवरकर


महादरबार न्यूज नेटवर्क -
१९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा. लि. मध्ये सध्या रिंग व चैन  महोत्सव सुरू झाला असून या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचे प्रतिपादन शिरसुफळ गावच्या सरपंच जुई हिवरकर यांनी केले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.


वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे  सहभाग घेणारी ही सुवर्णपेढी ग्राहकांच्या आढळ विश्वासास पात्र ठरत असून रिंग व चैन महोत्सवा मध्ये उपलब्ध असणारे कलेक्शन  आपण आमच्या बारामती व एमआयडीसी शाखेत जरूर पहावे असे चंदुकाका सराफ प्रा.लि.संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर बारामती विभागाचे उपाध्यक्ष श्री शिवाजी निंबाळकर व सौ भाग्यश्री निंबाळकर डॉक्टर नवनाथ मलगुंडे लेखक शेखर हुलगे बांधकाम व्यावसायिक विश्वास जगताप व स्नेहलता जगताप उपस्थित होते. तसेच या शाखेचे शाखाप्रमुख रोहित आवदे, नवनाथ गिऱ्हे,अश्विनीकुमार पत्की, कुलदीप जगताप उपस्थित होते.सदरील उद्घाटनासाठी दीपक वाबळे, कुलदीप बावणे व कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम