#Yavat शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊसाला आग ,शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील राहू गावच्या नजिक विद्युत शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊसाला आग लागल्याची घटना दि २८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. आगीमुळे संबंधित शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटची सविस्तर माहिती अशी आहे की, राहू गावच्या हद्दीत सुवर्णा सिद्धार्थ भालेराव यांनी शेत जमीन गट क्रमांक ८५४ मध्ये एक एकरामध्ये ऊसाचे पीक घेतले असून हा ऊस तेरा महिन्यांचा झाला होता. या ऊसाच्या शेतावरून महावितरणची वीजपुरवठा करणारी मुख्य लाईन गेली आहे. या लाईनची एक तार तुटून ऊसाच्या शेतात पडल्यामुळे ऊसाला आग लागली. सध्या उन्हाचा पारा वाढत गेला असताना लागलेली आग अधिकच भडकून एक ऊस पूर्णतः जळाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या केबल जळून देखील नुकसान झाले. महावितरणच्या शेतावरून गेलेल्या मुख्य लाईनची विद्युत तार ऊसाच्या शेतात पडून ऊसाला आग लागून नुकसान झाल्यामुळे महावितरण विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.
Comments
Post a Comment