#Malshiras माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उपद्रवी इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस पोलीस स्टेशन पोलिसांची कारवाई
दिनांक ७ में २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून माळशिरस पोलिसांनी एकूण ६०४ उपद्रवी इसमा विरूद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे.
त्यामध्ये सीआरपीसी १४४ प्रमाणे ७० इसमाना हद्दपार करण्याचे नोटीस बजानेत आल्याआहेत.
सीआरपीसी ११० प्रमाणे ज्या इसमाविरुद्ध दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत असे इसमा कडून चांगले वर्तनुकीचे बाँड लिहून घेण्यात आले आहेत.
तसेच ज्या इसमा विरुद्ध दारूबंदीच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त केसेस आहेत त्यांच्याकडून चांगले वर्तनुकीचे बाँड लिहून घेण्यात आलेले आहेत तसेच काही दारू विकणारे इसम यांना हद्दपार करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे काही इसमास तडीपार करण्यात आले आहे.
सीआर पीसी १०७ प्रमाणे ४१५ इसमा विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
पिलीव घाटात व जळभावी घाटात नाकाबंदी सुरू असून बारकाईने वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे तसेच दोन भरारी पथके तयार करून आचारसंहितेच्या भंगा विरुद्ध घडणाऱ्या घटनेची कसून शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे.
आचारसंहिता भंग करणारे इसमा विरुद्ध आचार संहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत
कोणीही कायद्याचा भंग करू नये तसेच सर्व नागरिकांनी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment