Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute तहसील कार्यालय व कारूंडे ग्रामपंचायत यांच्या वतीने शैक्षणिक दाखल्यांचे शिबिर


महादरबार न्यूज नेटवर्क -
तहसील कार्यालय माळशिरस व कारूंडे  ग्रामपंचायत यांच्या वतीने १४ जून २०२४ रोजी कारूंडे येथे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखल्यांचे  शिबिराचे आयोजन केले आहे.

सध्या दहावी बारावी विद्यार्थ्यांचे शाळेचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अडचण होऊ नये याचा विचार करून तहसील कार्यालय माळशिरस व ग्रामपंचायत कारूंडे यांनी विविध शैक्षणिक दाखले वेळेत व लवकर मिळावेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारूंडे या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले  त्वरित वितरित करण्यात येणार आहेत. तरी कोथळे, पिंपरी, मोरोची, धर्मपुरी व कारूंडे येथे विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उद्या सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारूंडे येथे उपस्थित रहावे व सदरील शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तलाठी, मंडल अधिकारी व कारूंडे ग्रामपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments