#Chiplun सरस्वती कोचिंग क्लासेस व टीडब्ल्यूजे फाउंडेशन यांच्या विद्यमाने टेरव येथे कृषी दिनी वृक्षारोपण


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
कोचिंग क्लासेस मुंबई व टीडब्ल्यूजे फाउंडेशन चिपळूण यांच्या विद्यमाने टेरव येथे कृषी दिनी १ जुलै रोजी काजू, चिंच, पिंपळ, फणस, सोनचाफा, वड, कोकम, आपटा व बेल अश्या ६२०  पर्यावरण पूरक झाडांच्या रोपांचे  निःशुल्क वाटप व लागवड करण्यात आली. वाढलेले तापमान, पावसाची अनियमितता याचा  सारासार विचार करून टेरव येथे पर्यावरण पूरक झाडांची रोपे लावून ती जागविण्याचा निश्चय सर्व ग्रामस्थांनी केला.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायत टेरव, सुमन विद्यालय, जिं. प.शाळा, मंदिर व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ टेरव यांचे सहकार्य लाभले. सरस्वती कोचिंग क्लासेसच्या  मुंबईहून आलेल्या १० सदस्यांनी  रोपांचे वाटप व लागवडीचे उत्तम नियोजन केले होते. मराठी मित्र मंडळ वापी यांनीही या कामी सहकार्य  केले.

कोकणात  होत असलेली  अमर्याद वृक्ष तोड, वणवे  यामुळे जलसिंचन, भूगर्भातील जलसाठा वाढणारे कार्बनडाय ऑक्साईड,  मोठ्या प्रमाणात होणारा ऑक्सीजन  निर्मितीवर परिणाम, जमिनीची धूप, होणारे भूस्खलन, अनियमित पर्जन्यवृष्टी, ढगफुटी व जैवविविधतेची हानी अश्या अनेक गंभिर परिस्थितीला  आपल्या सर्वांना सामोरे जावे लागत आहे व पुढे ही जावे लागणार आहे. या बाबत उपस्थित ग्रामस्थ  व विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम