Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras माळशिरस च्या वाघमोडे परिवाराने सीमेवरील सैनिकांना पाठविल्या हजारो राख्या

सैनिकांसाठी संसदेत आवाज उठवणार - खासदार धैर्यशील मोहिते पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -
सैनिक म्हटले की आपल्या शरीरात एका अद्भुत शक्तीचा संचार झाल्याचे अनुभूती येते. सैनिकांच्या योगदानातूनच संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. देशप्रेमाचे जिवंत रूप म्हणजे देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत ही खडा पहारा देत देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाची बाजी लावणारा सैनिक सण असो वा आनंदाचा दिवस देत सेवा हाच मोठा सण मानणारे सैनिक बांधव या सैनिक बांधवांमुळेच आपण ताठ मानेने देशातील महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहत असतो. अशा या सैनिक बांधवांच्या योगदानाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्या प्रति स्नेहभाव जपावा. 

त्यांनाही देशातील बहिणींची मायेचा प्रेमळ ओलावा अनुभव ओलावा अनुभवता यावा या जाणिवेतून " एक राखी सैनिकांसाठी" ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील श्री व सौ शोभा तानाजी वाघमोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठविण्याचा कार्यक्रम  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते  माळशिरस पंचायत समिती माळशिरस येथे करण्यात आला.


आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या दिवस-रात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कश्मीर ते कन्याकुमारी आणि राजस्थान ते मनिपुर पर्यंत असलेल्या सैनिकांसाठी माळशिरस मधील वाघमोडे कुटुंबीय सैनिका प्रति प्रेम आपुलकी निर्माण व्यक्त करत याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेले राखी देशातील १८ युनिटमधील  हजारो जवानांना हजारो राख्या पाठवल्या आहेत.


यावेळी देशातील जनतेला सैनिकाप्रतिम प्रचंड आदरभाव आहे सीमेवर कर्तव्यावर असणाऱ्या अथवा निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यांच्या अडचणीत जाणून घेऊन सैनिकांसाठी संसदेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले
पुढे बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी वाघमोडे कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक करीत असे उपक्रम सैनिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे अधिवेशनानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील सेवानिवृत्त सैनिकांची वर्षातून दोन वेळा बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. केंद्राच्या आग्नीवीर संकल्पनेला होणारा विरोध समजावून घेऊन सैनिकांसाठी आपले आधारित सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच १५ ऑगस्ट नंतर स्नेह मेळावा घेणार असल्याचेही जाहीर केले. सुभेदार विजयकुमार सावंत यांनी सैनिकांना समाजाचे पाठबळ ऊर्जा देत असते असे सांगितले तसेच सैनिकांना टोल माफ व्हावा तसेच मुलांना पदवी उत्तर शिक्षण मोफत मिळावे असे मागणी केले मेजर राजेंद्र आढाव यांनी सैनिकाच्या अडचणी सांगून त्या अडचणी संसदेत मांडण्याचे मागणी केले. यामध्ये तालुक्यात मिलिटरी कॅन्टींग सुरू व्हावे सैनिकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा अकलूज मध्ये उपलब्ध व्हावे प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामार्फत केंद्राकडे करण्यात आल्या .

यावेळी  गटविकास अधिकारी मनोज राऊत ,उपाभियंता आर एस रणवरे ,सचिन रनवरे,माळशिरस नगरपंचायतच्या नगराध्यक्ष ताई वावरे, नगरसेविका रेश्मा टेळे , नगरसेवक शिवाजीराव देशमुख,सहारा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉक्टर श्रद्धा जंवजाळ ,जिल्हा परिषद सदस्य मंगलताई वाघमोडे ,शोभा वाघमोडे, भाजप शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, शिवाजी गोरड,त्रिदल माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्र आढाव ,तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, माजी सैनिक मारुती वाघमोडे, बापू वाघमोडे, रत्नप्रभादेवी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर, प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष संजय पवळ,प्रगतशील बागायतदार बबन देवकते ,तरंगफळ चे सरपंच नारायण तरंगे, रत्नप्रभादेवी बिजो .सह. संस्थेचे उपाध्यक्ष सुजित तरंगे ,पत्रकार अनंत दोशी, शिवाजी पालवे, भारत मगर,स्वप्निल राऊत, आनंद शेंडगे, संजय हुलगे, सागर मेडिकलचे मालक नितीन गायकवाड, अजिंक्य मेडिकलचे मालक विलास कुदळे ,कन्या प्रशालाच्या सुरेखा लाळसंगी , अँड .रूपाली गोरे , अन्वी बोना,वाघमोडे परिवार तसेच बहुसंख्येने माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार सावता गोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments