#Phaltan चंदुकाका सराफच्या फलटण शाखेच्या वतीने वारकऱ्यांना मोफत पाणी व बिस्किट वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या फलटण येथील नुकत्याच सुरू होत असलेल्या सुवर्णपेढीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांची सेवा म्हणून मोफत पाणी व बिस्कीट वाटप करण्यात येत असून यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले. अवघा वैष्णवांचा मेळा  फलटण नगरीमध्ये विसावला जाणार असून या सुवर्णपेढीचा शुभारंभ अजून होणे बाकी आहे त्या अगोदरच आपल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून  वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याची माहिती या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी सांगितले. तसेच हडपसर, चंदन नगर, बारामती,अकलूज व पंढरपूर शाखेच्या वतीने देखील असा उपक्रम राबवला जात आहे.


सध्या या सुवर्णपेढीच्या हडपसर, चंदननगर, बारामती, एमआयडीसी बारामती,अकलूज, पंढरपूर,सोलापूर, अहमदनगर, नाशिक,संगमनेर या ठिकाणी शाखा असून फलटण या शाखेचा शुभारंभ जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णपेढीला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी या शाखेचे श्री श्रेणिक दानोळे, मार्केटिंग विभागाचे धनंजय माने, विनोद जगताप, अक्षय टिके, प्रदीप अलगुडे, कैलास कसबे हे उपस्थित होते. सदरील उपक्रमासाठी मार्गदर्शन मार्केटिंग विभाग प्रमुख श्री अमोल पात्रे,श्री कुमार राठोड,व सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम