#Natepute नातेपुते येथील प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २१ जुलैला वृक्षारोपण करण्याचे नियोजन
महादरबार न्यूज नेटवर्क -
प्रबुद्ध मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २१ जुलै रोजी नातेपुते येथील शासनाच्या जागेवरती तसेच अंगणवाडी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे नियोजन चार जुलै रोजी पालखी मैदाना जवळील संस्थेच्या कार्यालयात बैठक घेऊन करण्यात आले, सध्या मान्सूनचा हंगाम सुरू असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे संस्थेचा पहिलाच राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून २१ जुलैला संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्याचे ठरले बैठकीचे अध्यक्ष म्हणून खजिनदार युवराज वाघमारे यांनी कामकाज पाहिले आणि सर्व संचालकांच्या मंजुरीने एक मताने या राष्ट्रीय कार्यक्रमास मंजुरी देऊन या नवसंस्थेच्या बहुउद्देशीय कार्याचा शुभारंभ संपन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माणिक देठे, उपाध्यक्ष राहूल भोसले, सचिव सुनिल साळवे,सहसचिव बौद्धाचार्य प्रकाश साळवे, संचालिका लक्ष्मी देठे, श्रीम.सुजाता भोसले.श्रीम.योजना निकाळजे, सौ.सुवर्णा नलवडे. माजी मुख्याध्यापक तथा संचालक पांडुरंग सोरटे,शिवाजी साळे,. नितीन सोरटे, निनाद सोरटे, पत्रकार विलास भोसले आधी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे ध्येय धोरण या विषयावरही चर्चा करण्यात आली संचालिका सौ ललिता युवराज वाघमारे यांनी उपस्थितांना दूध खिरीचे दान देऊन गोड कार्यास गोड शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करा पृथ्वी वाचवा अशी जनजागृती ही करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले.
Comments
Post a Comment