#Akluj अकलूज बस डेपो चा कायापालट करणार - भरत गोगावले
महादरबार न्यूज नेटवर्क -
अकलूज बस डेपो साठी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री भरत शेठ गोगावले यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त यांच्याकडून आळंदीच्या बैठकीत सत्कार करून निवेदन दिले .
निवेदनात म्हटले आहे की अकलूज बस डेपोला पूर्वी जवळपास ११० बस उपलब्ध होत्या पूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी विद्यार्थी हे लाल परी तून प्रवास करीत असे बस जास्त जुन्या होत गेल्या तशा त्या स्क्रॅप झाल्या नव्या बस उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महिलांसाठी अर्ध तिकीट योजना लागू केली परंतु लाल परी ची संख्या कमी असल्याने तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या लाल परी ची संख्या कमी आहे त्यामुळे माता-भगिनींना याचा लाभ घेता येत नाही.त्याची संख्या ६० वर आली अकलूज बस डेपोसाठी जवळपास ४५ कर्मचारी अत्यावश्यक आहेत त्यामध्ये लिपिक चालक वाहक वाहतूक नियंत्रक यांचा समावेश आहे.
नव्याने अकलूज डेपोसाठी किमान ५० गाड्या मिळाव्यात त्यामुळे अकलूज बस डेपो हा पूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. नोकरीच्या शिक्षणनाच्या देवदर्शनाच्या निमित्ताने तालुक्यातील माता-भगिनींना विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल अशी मागणी शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगवले यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत टप्प्याटप्प्याने सर्व उणीवा दूर करण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment