#Chiplun आ.शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कासारकोळवण येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये(अजितदादा गट)जाहीर प्रवेश

कासारकोळवण गावच्या विकासासाठी आपण सदैव कटीबध्द- आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील मुंबईकर प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षामध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला आहे.सावर्डे येथील आमदार श्री.शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या पक्ष प्रवेशासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष करंबेळे,सचिव राजाराम रावणंग,उपसरपंच प्रकाश तोरस्कर,सेवानिवृत्त शिक्षक राजाराम तोरस्कर,वाडी गावकर सुर्यकांत करंबेळे,ग्रा.पं.सदस्या श्रध्दा करंबेळे आदींनी पुढाकार घेतला तर पक्षप्रवेश कर्त्यांमध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष करंबेळे,सिताराम करंबेळे,चंद्रकांत गणू करंबेळे,आदिनाथ करंबेळे,वाडी गावकर सुर्यकांत करंबेळे,ओंकार करंबेळे,शंकर भोसले,विलास भोसले,राजाराम रावणंग,राजाराम करंबेळे,निलेश करंबेळे,संजय करंबेळे,आत्माराम करंबेळे,राकेश राजाराम तोरस्कर,चंद्रकांत तुकाराम करंबेळे,विजय बाळकृष्ण करंबेळे,शांताराम करंबेळे,रघुनाथ करंबेळे,संदीप महादेव करंबेळे,पुरूषोत्तम तोरस्कर,राजाराम सावजी तोरस्कर,अनंत करंबेळे,संतोष भोसले,राजाराम भोसले,राजाराम बाबाजी भोसले,गणेश करंबेळे,दत्ताराम करंबेळे,संदीप जयराम करंबेळे,बाळकृष्ण तोरस्कर,अनंत तोरस्कर,विनोद कोलगे,सुरेश करंबेळे,राहूल करंबेळे,सुनील शिवराम करंबेळे,रविंद्र तोरस्कर,राकेश रविंद्र तोरस्कर,कृष्णा घाटबाणे,विवेक मांडवकर,सदानंद तोरस्कर,शैलेश तोरस्कर,राजाराम सखाराम तोरस्कर,राजाराम घाटबाणे,आत्माराम सनगले,निलेश सनगले,ग्रा.पं.सदस्या श्रध्दा करंबेळे,गंगाराम करंबेळे,महादेव भोसले,दत्ताराम भोसले,सुजाता करंबेळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आमदार शेखर निकम  यांचे अगोदरपासून गावागावात विकास करण्याचे ध्येय होते आणि त्या सानिध्यातून त्यांचे समाजकार्य चालूच होते,मात्र आमदार होण्याची संधी त्यांना जनतेच्या माध्यमातून मिळाली.जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात नियोजनबद्ध असा विविध विकास कामाचा झपाटा लावला.त्यातून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली व जनतेमध्ये छाप पाडली.ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचशे प्रलंबीत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून दिला आहे.दरम्यान,या प्रवेशकर्त्यांचे आमदार शेखर निकम  यांनी आभार मानले व राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत केले.पक्षांर्तगत कामे करताना संघटीत होवून कामे करा व पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीज जास्त प्रयत्नशील रहा यामध्ये लहान-मोठे,पदाधिकारी-कार्यकर्ते, जूने-नवीन कार्यकर्ते हा भेदभाव विसरुन सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार करा.विकास कामांची,निधीची तुम्ही चिंता करु नका ती माझी जबाबदारी राहील असा शब्द आमदार श्री.निकम सर यांनी ग्रामस्थांना यावेळी दिला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम