#Chiplun मुस्लिम समाज यांचेमार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहाला संरक्षक भिंत बांधणेसाठी रु. १ कोटी २५ लक्ष इतका निधी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत उपलब्ध

काम करत राहू,काम करतच राहणार- आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुका मुस्लिम समाजामार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहास संरक्षक भिंत बांधणेस लेखाशीर्ष २५१५ मधून निधी उपलब्ध व्हावा असे मुस्लिमबांधवांमार्फत आमदार शेखर निकम यांना निवेदन प्राप्त झाले होते कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी क्षणाचा विलंब न लावता आपलं कामास १००% निधी प्राप्त करून देऊ अशा शब्द दिला.


चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण येथील मुस्लिम समाज यांचेमार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहाला संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असून त्यासाठी रु. १ कोटी २५ लक्ष इतका निधी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात यावा असे मा. उप-मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांना तो प्राप्त व्हावा यासाठी पत्र देत पाठपुरावा करत सदर निधी मंजूर करून आणला.

हा निधी मंजूर करून आणत सर्व समाजाला सोबत घेत मतदार संघाचा विकास आपण करतो हे सिद्ध केले तसेच त्याच पद्धतीने विकासासाठी आमदार शेखर निकम पायाला भिंगरी बांधून झटत आहेत.

आपल्याला सर्व अगड - पगड जाती-धर्माला साथीला घेऊन मतदार संघाचा विकास करायवायचा आहे अन तो विकास आपणास मा. ना. उपमुख्यमंत्री विकासाचे महामेरू श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली करायचा आहे कारण शब्दाला पक्का असणारा नेता म्हणजे अजित दादा  दादाचा वादा याचे मूर्तीमन उदाहरण म्हणजे हे काम आहे म्हणूनच त्यांच्या  कायमस्वरूपी पाठीशी ठामपणे उभे राहू.

१ कोटी २५ लक्ष इतका निधी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत उपलब्ध झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,पालकमंत्री उदयजी सामंत , तसेच ग्रामविकास मंत्री महाजन साहेब महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम