#Yavat कानगाव येथे विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने दप्तर वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
शिवसेना (शिंदे गट)दौंड विधानसभेच्या वतीने कानगाव येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.


कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, विधानसभा समन्वयक नवनाथ जगताप, विधानसभा क्षेत्रप्रमुख हनुमंत निगडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल फडके, उप तालुकाप्रमुख दिलीप भागवत, शिवसेना शाखाप्रमुख चेतन पासलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यासह कानगावचे माजी सरपंच संपत तुकाराम फडके, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, संचालक आप्पासाहेब कोऱ्हाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कोऱ्हाळे आणि उपाध्यक्ष योगेश चौधरी यांचीही या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.

शाळेचे मुख्याध्यापक श्यामराव जगताप यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

शिवसेनेने तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. यापुढेही असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात पुढे करत राहू, असा विश्वास जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम