#Natepute नातेपुते नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सत्ताधारी गटात अंतर्गत ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर म्हणजे ३०आॕगस्ट रोजी मालोजीराजे देशमुख यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.नगराध्यक्षा अनिता लांडगे यांनी सुचक म्हणून उपनगराध्यक्ष या पदासाठी अतुल पाटील यांचे नाव सुचवले त्यास अनुमोदन मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख यांनी दिले. अतुल पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.एकच उमेदवारी अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी बार्शी नगरपरिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी अतुल पाटील यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली.

यावेळी नगराध्यक्षा अनिता लांडगे,माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे ,ज्येष्ठ नगरसेवक बी वाय राऊत ,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील जिल्हा नियोजन सदस्य सतिश सपकाळ ,आप्पासाहेब भांड, अतुल बावकर, नगरसेवक अण्णा पांढरे,रणजित पांढरे,अविनाश दोशी,दादासाहेब उराडे,रावसाहेब पांढरे,दिपक काळे,सुरेंद्र सोरटे,माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे,नगरसेविका स्वाती बावकर,दिपीका देशमुख,संगिता काळे,तसेच माऊली उराडे,रणवीर देशमुख,रणजीत काळे,संदीप ठोंबरे,नंदू लांडगे ,बाळासाहेब काळे,अमित चांगण आदी उपस्थित होते.निवड झाल्यानंतर फटाकेची आतिशबाजी करण्यात  आली व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम