#Indapur इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात तर उपाध्यक्षपदी शहाजीराजे भोसले यांची निवड

इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर


महादरबार न्यूज नेटवर्क -
मुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न इंदापूर तालुका पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक १ सप्टेंबर २०२४ रोजी भरणेवाडी ग्राम सचिवालयात सकाळी ११ते दु. १२ यावेळेत बिनविरोध पार पडली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी.शेलार ( दौंड ) व सह.निवडणूक निर्णय अधिकारी रवी पाटील ( शिरूर ) यांनी काम पाहिले.

इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नव-निर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नव निर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे -

राजकुमार थोरात - अध्यक्ष
शहाजीराजे भोसले - उपाध्यक्ष
शत्रुघ्न ओमासे - उपाध्यक्ष
गजानन टिंगरे - उपाध्यक्ष
तात्यासाहेब घाटे - सचिव
प्रदिप तरंगे - सहसचिव
हरिदास वाघमोडे - खजिनदार
महेश गडदे - सह.खजिनदार
धनंजय थोरात - संघटक
बाळासाहेब धवडे - संघटक
संभाजी रणवरे - सह.संघटक
संतोष भरणे - समन्वयक
डॉ. विकास शहा - सल्लागार

मान्यवरांचे व पत्रकारांचे आभार जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतिश सांगळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम