महादरबार न्यूज नेटवर्क - सर्वसामान्य माणसांचा आधार तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून समजले जाणारे वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे आपल्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात कार्यतत्पर असणारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करून गुन्हेगारांचे मत परिवर्तन करून त्यांना एक चांगला माणूस म्हणून समाजात ताठ मानेने जगता यावं म्हणून तसेच त्यांची मानसिकता बदलून जगण्याची नवी संधी नवी उमेद प्राप्त करून देऊन त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून रोखण्या चा प्रयत्न करणारे सण उत्सव मिरवणुकीत सहभागी होऊन भाईचारा निर्माण करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून आदर्श पोलीस ठाण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे आपल्या जबाबदारी सह सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून जातीय सलोखा राखून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नुकताच मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिनेश पवार उपस्थित होते.
0 Comments