#Solapur नातेपुते येथील राहुल राजेंद्र काळे यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरीचे प्रगतशील बागायतदार राहुल राजेंद्र काळे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन(आत्मा) सोलापूर यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , पुण्याचे आत्मा संचालक अशोक किरनळी पुणे, सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसने, सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आत्मा मुकुंद मुकणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राहुल राजेंद्र काळे यांनी आतापर्यंत द्राक्ष पिकामध्ये पाऊस व गारापासून संरक्षण होण्यासाठी संरक्षित कागदाचा वापर व जमिनीलगत प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तसेच डाळिंब पिकामध्ये एक खोड या पद्धतीचा अभिनव प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतले तसेच यशस्वी प्रयोग एक खोड डाळिंब पद्धतीचा एक घेण्यासारखा आहे तसेच शेतीमध्ये भौतिक पद्धत, सेंद्रिय निविष्ठाचा वापर,निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क, सोलर ट्रॅप, फेरोमेट्रॅप,वारा प्रतिबंधक बेल्ट प्लास्टिक मल्चिंगचा वापर इत्यादी आधुनिक पद्धतीचा वापर करून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अवलंब केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन(आत्मा) सोलापूर यांच्या वतीने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी अरविंद मधुकर पांढरे,राजेंद्र धुळा काळे, तात्यासाहेब देशमुख, तसेच शेतकरी मंडळी उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस व मंडल कृषी अधिकारी कार्यालय नातेपुते यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment