#Yavat श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात वन उद्यानाचा विकास करण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव - आमदार राहुल कुल
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरातील वन उद्यानाचा विकास व्हावा म्हणून नुकतेच वनमंत्री मा. नामदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दौड चे आमदार राहुल कुल यांनी निवेदन दिले होते. त्याबाबत वन विभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी साहेब यांना बैठक घेण्याचे आदेश पर्यटन मंत्री यांनी दिले होते. त्यानुसार दुरदृश्य प्रणालीद्वारे दि .२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वन जमिन असून या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणवर भाविक भक्त येत असतात, श्रावण महिन्यात मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वन उद्यानाचा विकास करण्यासाठी २ कोटींचा निधी मिळावा अशी मागणी केली.
यावेळी प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी साहेब यांनी २ कोटींच्या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला मुख्य वन संरक्षक पुणे श्री. एन.आर. प्रवीण, उपवन संरक्षक पुणे श्री. महादेव मोहिते, उपसचिव श्री. विवेक होशिंग आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment