#Chiplun चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळांचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते यांचा आमदार शेखर निकम यांना बिनशर्त पाठींबा

सर्व जाती धर्माच्या लोकांना साथीला घेत मतदार संघाचा कायापालट करणार - आ.शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
संगमेश्वर तालुक्यातील चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी,सभासद व कार्यकर्ते (स्थानिक व मुंबई) यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई येथे आमदार श्री.शेखर निकम सर यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला.

आ.शेखर निकम  यांनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण न करता सर्वाना एकत्रीत साथीला घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांच्या अडी-अडचणी व मतदार संघातले प्रश्न लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करत तसेच अधिवेशनामध्ये मांडत ते कसोशीने सोडवले आहेत.त्यांनी आतापर्यंत केलेला वाडी वस्त्यांतील नियोजनबद्ध विकास आणि कोणतीही अडचण लिलया सोडवली आहे.तसेच न भूतो न भविष्यती अशी चौदाशे कोटींपेक्षा जास्तीचा निधी मंजूर करत मतदार संघाचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेऊन ते पुर्ण करण्याचे दृष्टीने कमालीचे प्रयत्नशील आहेत.

सर्व सामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा शांत संयमी नेता आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांस बिनशर्त पाठींबा देण्याचा हा मोलाचा निर्णय चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाने घेतला आणि आ. शेखर निकमांच्या प्रत्यक्ष निवडणूकीमध्ये केव्हाही,कधीही प्रचारासाठी उपलब्ध आहोत असा शब्द दिला.

या भेटी दरम्यान आ.शेखर निकम यांनी चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाशी चर्चा केली त्यांच्याशी संवाद साधला.त्यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या पुढील काळात कशा सोडविण्यात येतील याबाबत बोलून त्याबाबत मार्गदर्शन केले व आपल्या सर्व समस्या नक्कीच सोडवू असा विश्वास चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळ पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते यांना दिला.

यावेळी सिद्धार्थ सावंत,अध्यक्ष (तांबेडी),भगवान कदम,उपाध्यक्ष (कुचांबे),अनंत कदम,उपाध्यक्ष (मासरंग),हरीचंद्र पवार,सचिव (तुरळ),चिंतामणी कदम,सहसचिव (शेनवडे),विनायक मोहीते,ऑडीटर (चिखली), संदिप कांबळे,कार्यकारणी सदस्य(कडवई),गंगाधर कदम,कार्यकारणी सदस्य (शेनवडे),अनिल मोहीते,गाव प्रतिनिधी (चिखली) इ.चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत