महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार, श्री.सुरेश विठ्ठलराव शेजुळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, संकल्प बहुउद्देशीय संस्था, गुरसाळे व वेध महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा होत आहे. आज दि.१३ सप्टेंबर रोजी माळशिरस- सिद्धार्थनगर येथे, विविध वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी,संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार,कोळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-विलास एकनाथ भोसले, अजित पवार (सर),मारुती भांगरे (सर), ॲड. नितीन भोसले, अकलूज येथील तुकाराम साळुंखे-पाटील, सुनील ओवाळ,दीपक कांबळे, सुमित धाईंजे,सोमनाथ अशोक धाईंजे,रोहन धाईंजे, सोमा धाईंजे,सूरज कांबळे,आनंद कांबळे,आश्रफ मुल्ला,आतिश कांबळे,राम धाईंजे आदी उपस्थित होते. यावेळी आंबा, जांभूळ,चिंच, आदी, फळझाडांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली व तहसीलदार, श्री.सुरेश शेजुळ साहेबांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त केल्या.
0 Comments