Posts

Showing posts from October, 2024

#Yavat ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार विजय

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दि. २० ऑक्टों रोजी  पिंपरी चिंचवड निगडी या ठिकाणी मीनाताई ठाकरे स्टेडियम यमुना नगर या ठिकाणी  सहावी महाराष्ट्र राज्य बॅडी स्केटिंग( स्केटिंग हॉकी ) राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचे स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि  पुणे अशा एकूण दहा जिल्ह्याने यामध्ये सहभाग नोंदणी त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या साडेतीनशे व संघ संख्या ५० एवढी होती त्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातून ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. मुलांचे तीन संघ व मुलींचा एक संघ या चारही संघाने बाकी सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले व राष्ट्रीय पातळीवर ग्रेट स्पोर्ट अकॅडमीच्या संघाची निवड झाली. यामध्ये आठ वर्षाखालील मुलींचा संघ द्रीशा कुंजीर, मृनाली खंडाळे, अंजली सुकळे, आरोही चौधरी आणि आदिती भोसले आठ वर्षाखालील मुलांचा संघ अर्णव कुंभार, स्वरूप शेलार, आयांश दुसाने, रोनक शिंदे, साईराज पाडोळे आणि ऋत्विक कुंभार दहा वर्षाखालील मुला

#Chiplun जि.प.शाळा धामणी नं.२चे पदवीधर शिक्षक अंकुश गुरव यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव जिल्हा परिषद शाळा धामणी नं.२ चे पदवीधर शिक्षक श्री. अंकुश गुरव आपल्या ३७ वर्षाच्या शिक्षण खात्यातील प्रदीर्घ सेवेतून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा अभिष्टचिंतन सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन जि.प.शाळा धामणी नं.२ येथे शाळा व्यवस्थापन समिती धामणी तसेच धामणी आणि अंत्रवली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणी व अंत्रवली  केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भास्कर जंगम सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ उद्योजक श्री प्रभाकर घाणेकर हे होते. सेवापुर्ती सोहळ्याच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती धामणी  तसेच धामणी, अंत्रवली केंद्र, जि.प. शाळा धामणी नं. २ आणि उपस्थित मित्रपरिवार यांनी श्री अंकुश गुरव यांचा श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि भेट वस्तूच्या माध्यमातून सपत्नीक सत्कार केला यावेळी अनेक मान्यवर तसेच शिक्षक यांनी सेवानिवृत्त शिक्षक श्री.अंकुश गुरव यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेतला.       श्री अंकुश गुरव यांचा गुणगौरव करताना मान्यवर म्हणाले ,की श्री. गुरव

#Solapur मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूजवर करडी नजर ठेवावी - निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम

Image
जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट व कामकाजाची पाहणी सोलापूर ,  दि.  30 ( जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने निर्भय व निष्पक्ष पदधतीने मुद्रित व  इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह सोशल मिडीयाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल यांनी दिले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के ,  समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण ,  सदस्य डॉ श्रीराम राऊत ,  अंबादास यादव ,  रफिक शेख ,  गणेश बिराजदार ,  सचिन सोनवणे आणि समीर मुलानी आदी उपस्थित होते. निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असून समाज माध्यमाद्वारे होणाऱ्या प्रचारावरह